नंदागौळ येथे रेशनचा परवाना नसल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार घरपोहच रेशन योजना सुरू केली होती. मागील ७ वर्षापासून या योजनेद्वारे तलाठ्यामार्फत रेशन वाटप सुरळीत सुरू होते. परंतु मागील ६ महिन्यांपासून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ही लोकाभिमुख योजना बंद करण्याचा घट घातला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या योजनेमुळे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार व गैरप्रकार होत नाही थेट प्रशासनातील तलाठी रेशनचे वाटप करतात. त्यामुळे कार्डधारकांना या योजनेच्या माध्यमातून आपल्या हक्काचे रेशन मिळते पण काही रेशन माफियांचे ऐकून चांगली योजना बंद करण्याचा प्रयत्न तहसील प्रशासन करत असेल तर आंदोलन करणार असल्याचे गित्ते यांनी सांगितले. याबाबत परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ म्हणाले की, शासनाने आता तलाठ्यामार्फत धान्य वाटप बंद केले असून शेजारील दुकानदाराला जोडून शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्याबाबत सूचना आहेत. नंदागौळ येथील स्वस्त धान्य दुकान वसंतनगर तांडा येथील दुकानदाराला जोडल्याचे त्यांनी सांगितले.
घरपोहच रेशनसाठी नंदागौळ ग्रामस्थांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:30 AM