शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

‘नारीशक्ती दूत’ ॲप स्लो चालतंय; ‘लाडकी बहीण’च्या मनात धाकधूक !

By शिरीष शिंदे | Updated: July 9, 2024 12:48 IST

लाडकी बहीण योजनेच्या ॲपवर उत्पन्नाचा पर्याय कायम, महिला संभ्रमित

बीड: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत सहभागी होण्यासाठी ‘नारीशक्ती दूत’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी योजनेतील काही नियमात बदल करीत महिला अर्जदाराकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे व केशरी रेशनकार्ड स्वीकारले जाईल असे जाहीर केले होते; परंतु सदरील ॲपवर ऑनलाईन अर्ज भरताना उत्पन्नाचा पर्याय कायम आहे. त्यामुळे अर्जदार महिला संभ्रमित झाल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. ही राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असल्याने त्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: लक्ष देऊन आहेत. योजनेमध्ये बदल झाल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी बराच कालावधी शिल्लक असला तरी अर्ज प्राप्त करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. तसेच या योजनेचे मोबाईल ॲप डाऊनलोड केल्यानंतर अनेकांना लॉगिन करता आले नाही. नारीशक्ती हे ॲप सुटसुटीत आहे परंतु ग्रामीण भागात रेंज नसल्यामुळे किंवा इतर कारणामुळे हे ॲप सुरू होण्यास वेळ लागत असल्याचा अनुभव अनेक महिलांना येत आहे. यामुळे अर्ज घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविकांकडे वळाले आहेत.

कुठे करता येईल अर्ज ?मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची सुविधा ऑनलाईन व ऑफलाईन करून देण्यात आली आहे. शहरी भागासाठी अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वाॅर्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी अर्ज केला जाऊ शकतो. तसेच नारीशक्ती या मोबाईल ॲपवरूनसुद्धा अर्ज दाखल करता येतो. ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज दाखल केले जाऊ शकतील.

पैशांची मागणी करीत असल्यास कारवाईच्या सूचनामुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले आहेत.

मोबाईल ॲपवर उत्पन्नाचा पर्याय असला तरी त्यात पिवळे व केशरी रेशनकार्डचा फोटो अपलोड केला जाऊ शकतो.- चंद्रशेखर केकान, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि.प. बीड

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारWomenमहिला