राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत खालपासून वरपर्यंत गद्दारांची फौज; सुरेश धस यांचा पलटवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 06:29 PM2017-11-14T18:29:01+5:302017-11-14T18:33:58+5:30
राज्याचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी काल आष्टी येथील आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात सुरेश धस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत 15 कोटी घेऊन भाजपाला मदत केल्याचा आरोप भर सभेत केला होता. त्या केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी माजी राज्यमंञी सुरेश धस यांनी आज दुपारी आपल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत बोलत होते.
आष्टी (बीड ) : स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कुटूंबाचा छळ करण्यासाठीच राष्ट्रवादी कॉग्रेसने धनजंय मुंडेना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिले आहे. तसेच जे विधान परिषदमध्ये फक्त मॅनेजमेंट करतात त्या धनजंय मुंडेनी आपल्यावर केलेल्या आरोपावर ठाम रहावे, त्यावेळेस त्यांनी शेपुट घालून गप बसू नये असे आवाहन माजी राज्यमंञी सुरेश धस यांनी पञकार परिषदेद्वारे केले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी काल आष्टी येथील आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात सुरेश धस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत 15 कोटी घेऊन भाजपाला मदत केल्याचा आरोप भर सभेत केला होता. त्या केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी माजी राज्यमंञी सुरेश धस यांनी आज दुपारी आपल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, कडा ग्रामपंचायतची सरपंच अनिल ढोबळे, युवराज पाटील, सुनिल रेडेकर,माऊली जरांगे यांच्यासह आदि उपस्थित होते.
अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
पुढे बोलतांना धस म्हणाले, धनजंय मुंडे हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत ते पवार काका-पुतण्याचे केंव्हा होणार. काल भरसभेत त्यांनी मी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 15 कोटी रूपये घेतल्याचा आरोप केला त्या आरोपावर त्यांनी आपण ठाम रहावे. स्व.पंडित आण्णा हे स्वतःच्या शब्दावर ठाम असायचे त्यांनीही यावेळी आपल्या शब्दावर ठाम राहवे कारण आपण त्यांच्यावर रितसर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत.
राष्ट्रवादी कारखानदारांचा पक्ष
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष हा बड्या बड्या कारखानदार व मोठमोठ्या राजकीय वारसा असलेल्या मराठा समाजाचा हा पक्ष असून आपल्या सर्व सामान्य शेतकरी यांच्या जिवावर राजकरण करतात पण हा पक्ष मराठ्याचा नावावर मोठा झाला पण हा पक्ष मराठ्यांचा नाही असा आरोप धस यांनी केला.
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीला गद्दारांची निष्ठा
ज्या राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत खालपासून वर पर्यंत सर्व गद्दारांची फौज भरली आहे. त्या पार्टीच्या नेत्यांनी आम्हाला गद्दार म्हण्यापेक्षा स्वतःच्या पार्टीच्या नेत्यांचे आत्मपरिक्षण करावे कारण त्या राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीला गद्दारांची निष्ठा असणा-यांना गद्दार म्हण्याचा नैतीक अधिकार नाही,असा टोला धस यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लागावला आहे.