लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने शेतक-यांची क्रूरचेष्टा केल्यामुळे सर्वसामान्य जनतेसह शेतक-यांमध्ये सरकारविषयी असंतोष आणि संताप आहे. कर्जमाफी, लोडशेडींग, हमीभाव, बोंडअळीचा प्रादुर्भाव, थकित पीक विमा यासह शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरूवारी आ.अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी व कार्यकर्ते यांनी सरकारविरूद्ध घोषणा दिल्या.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक, माळी गल्ली, मोमीनपुरा, भवानी पेठ, चिंतेश्वर गल्लीसह विविध मार्गावरून निघून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित यांनी केले. प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या गावातून हजारो युवक मोटारसायकल रॅलीने मोर्चात सहभागी झाले होते.
यावेळी भाऊसाहेब नाटकर, जालिंदर पिसाळ, पाटीलबा मस्के, ऋषीकेश बेदरे, समाधान मस्के, आनंद सुतार, जगन पाटील काळे, डिगांबर येवले, जगन्नाथ शिंदे, शाम मुळे, फुलचंद बोरकर, महंमद गौस, दत्ता पिसाळ, अर्जुन चाळक, बब्बू बारुदवाले, गुफरान इनामदार, शेख मन्सूर, नवीद मशायक, सय्यद नजीब, इर्शाद फारोकी, हन्नान, अब्दुल, जीजा पंडित, रामनाथ दाभाडे, विलास ठाकूर, वसीम फारोकी, शाम पाटील, सुंदर काळे, संग्राम आहेर, डॉ. विजयकुमार घाडगे, बाबासाहेब आठवले, डॉ. आसाराम मराठे, भरत खरात, साहेबराव पांढरे, नवनाथ वेताळ, राजेंद्र वारंगे, प्रभाकर ससाणे, मोतीराम गाडे, जयसिंह जाधव, लक्ष्मण देवकर, परमेश्वर खरात, तय्यब यांच्यासह राकाँचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा आहेत मागण्यासंपूर्ण कर्जमाफी, लोडशेडींग, हमीभाव बोंड अळीचा प्रार्दुभाव, थकित पीक विमा, दरोड्यांचा तपास, नादुरुस्त रोहित्र, कापसाला ५०० रु . प्रती क्विंटल बोनस, थकित नुकसान भरपाई, प्रलंबित भूसंपादन मावेजा आदी मागण्यांसाठी हा मोर्चाकाढण्यात आला.