शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

सात महिन्यानंतर योगेश्वरी देवीचे मंदिर झाले भाविकांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2021 2:14 PM

Goddess Yogeshwari कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता बाळगण्यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळाची  मिटिंग झाली.विना मास्क कोणालाही मंदिरात प्रवेश नाही.

ठळक मुद्देमास्क लावला तरच मंदिरात प्रवेशमंदिराची आकर्षक फुलांनी सजावट 

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास गुरुवारी सकाळी ९ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. तहसीलदार तथा योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष विपिन पाटील व रेणुका विपिन पाटील यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. दरवर्षी भाविकांच्या प्रचंड गर्दीत होणारा हा नवरात्र महोत्सव मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमात  साजरा होत आहे. 

७ आॅक्टोबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत  श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. गुरुवारी सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला. तहसीलदार विपिन पाटील  व सौ. रेणुका पाटील  यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेसाठी सचिव अ‍ॅड. शरद लोमटे, विश्वस्त राजकिशोर मोदी,अक्षय मुंदडा, भगवानराव शिंदे, माजी आ. पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ. संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा राम  कुलकर्णी, मंदीराचे मुख्य पुजारी तथा विश्वस्त सारंग पुजारी यांच्यासह पुरोहित,  मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली.

सात  महिन्यानंतर उघडले मंदिराचे महाद्वारतब्बल सात  महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी घटस्थापनेच्या  शुभ मुहूर्तावर भक्तांना श्री.योगेश्वरी देवीचे दर्शन उपलब्ध झाले.गेल्या सात महिन्या पासुन भाविकांना हि दर्शनाची ओढ लागलेली होती.महाराष्ट्राचे शक्तीपीठ व कोकणस्थांची कुलस्वामिनी,अंबाजोगाई चे ग्रामदैवत श्री.योगेश्वरीदेवी चे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यापासुन बंद राहिल्याने  दर्शन न झाल्याने  अनेकभक्त दर्शनासाठी व्याकुळ झालेले होते.कोरोना च्या साथीमुळे संसर्ग वाढू नये म्हणुन शासनाने अनेक कठोर निर्णय घेतले होते.यात सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. मार्च पासुन बंद झालेली ही मंदिरे कधी भक्तासाठी खुली होतील याची मोठी आस भाविकांना होती. मात्र घटस्थापने च्या मुहूर्तावर अखेर मंदिरे उघडल्याचा आनंद भाविकांमध्ये दिसुन आला. श्री.योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन भाविक दर्शनासाठी येतात.

मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट तब्बल सात महिन्यानंतर भाविकांसाठी सोमवारी  खुले झालेले योगेश्वरी मंदिर फुलांच्या माळांनी सजवले होते. साफ, सफाई करून परिसराची स्वच्छताही करण्यात आली. घटस्थापनेच्या  शुभमुहूर्तावर मंदिर खुले होताच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले योगेश्वरी मंदिर सोमवारी खुले होताच देवीच्या दर्शनाची ओढ लागलेल्या भाविकांनी सकाळीच दर्शनासाठी गर्दी केली होती. परंतू शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे स्वच्छता करून मंदिर खुले करण्यात आले. भाविकांना मास्क असल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. रांगेतील दोन भाविकात अंतर ठेऊन दर्शनास पाठवले जात होते. 

फोटो काढण्याचा आनंदअनेकांनी देवीचे दर्शन घेऊन, योगेश्वरी देवीचा फोटो काढण्याचा आनंदही अनेकांनी घेतला. काही भाविकानी  देवीचे दर्शन घेतले. त्यासोबतचे फोटो काढुन सोशल मिडीयावर टाकण्यासही विसरले नाहीत. मंदिरे उघडल्याचा इतका आनंद भाविकांना झाला होता.अशी माहिती मंदिराचे मुख्यपुजारी सारंग पुजारी यांनी दिली.

व्यावसायिकांना समाधानभाविकांबरोबरच देवीच्या परिसरात पुजा साहित्याचा व्यवसाय करणारांनाही आता आपलाही व्यवसाय सुरू झाल्याचा आनंद झाला होता. कोरोनामुळे मागील आठ महिने यांचे हे व्यवसाय बंद असल्याने, रोजगाराचा प्रश्न या दुकानदारांवर निर्माण झाला होता. मंदिर खुले होताच भाविकांची रीघ वाढल्याने, या दुकानदारांचे पुजा साहित्य विक्रीही सुरू झाली. पुरोहितांचाही पुजापाठ सुरू झाला.

मास्क लावला तरच मंदिरात प्रवेशकोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता बाळगण्यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळाची  मिटिंग झाली.विना मास्क कोणालाही मंदिरात प्रवेश नाही.भाविकांची गर्दी होऊनये त्यांच्यात सामाजिक अंतर राखले जावे.अशी व्यवस्था करण्यात आली आहे.मंदिर पूर्णपणे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.सुरक्षिततेच्या दृष्टीने पुर्ण उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.- गिरीधारीलाल भराडिया, उपाध्यक्ष- योगेश्वरी देवल कमेटी, अंबाजोगाई

टॅग्स :Navratriनवरात्रीBeedबीड