लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असनाता देखील नगरपालीकेच्या ढिसाळ करभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या विरोधात राष्ट्रवादीचे नेते तथा जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी आक्रेश हंडा मोर्चा काढला यावेळी मोठ्या संख्येने महिलांसह नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.बीड शहराला पाणीपुरवठा सुरळीत करावा. नगराध्यक्ष, नगरपालिका प्रशासन, आमदाराकडून पाण्यात होत असलेले राजकारण तात्काळ थांबविण्यात यावे. सर्वसामान्यांना हक्काचे पाणी मिळावे, पाणी पुरवठा विभाग सुरळीत पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या बीड पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार जिवन प्राधिकरणकडे द्यावा यासह इतर विविध मागण्यांसाठी शहरातील कारंजा रोड येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थित होती. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, माजी.आ.सुनील धांडे, हेमा पिंपळे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला होता. यावेळी संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड शहरातल्या जनता पाणी टंचाईने त्रस्त असताना जयदत्त क्षीरसागर मात्र मंत्रीपदासाठी मुंबईत मागील दीड महिन्यापासून मुंबईत तळ ठोकून होते. पाणीप्रश्न त्यांना गंभीर वाटत नाही अशी टीका त्यांनी केली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.
बीडमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:41 AM