शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
5
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
6
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
7
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
8
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
9
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
10
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
11
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
12
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
13
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
14
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
15
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
16
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
17
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
18
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
19
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
20
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?

रोगप्रतिकार शक्तीसाठी आहाराकडे लक्ष देण्याची गरज - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:22 AM

अंबाजोगाई : कोरोनानंतर संपूर्ण जगच बदलून गेले आहे. कोरोना संसर्ग झाला तरी फारसे घाबरण्याचे कारण नसले तरी, आजकाल प्रत्येकजण ...

अंबाजोगाई : कोरोनानंतर संपूर्ण जगच बदलून गेले आहे. कोरोना संसर्ग झाला तरी फारसे घाबरण्याचे कारण नसले तरी, आजकाल प्रत्येकजण कोरोना होऊच नये, यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविताना आहारात मूग, मटकी आदी कडधान्ये, ताज्या भाज्या, फळे, मांसाहार, दूध, हळदीचा वापर करत आहेत. शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहार तर आवश्यक आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नेमके काय खावे, म्हणजे कोरोनाच होणार नाही, हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे; मात्र शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहारासोबतच दररोज शरीराला व्यायामाचीही गरज आहे. दररोज दूध, हळद, फळे आहारात असणेही खूप गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ नागरिकांना देत आहेत. कोरोनामुळे अनेकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे कमी केले आहेत. मात्र एरव्ही अनेक जण फास्ट फूड आवडीने खात होते. आता मात्र एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसरीकडे आरोग्यावर फास्ट फूडचा होणारा परिणाम, यामुळे सध्या फास्ट फूडवर अघोषित बंदीच असल्याचे चित्र दिसून येत आहे. फास्ट फूडमुळे आरोग्यावरही विपरित परिणाम होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत. पिष्टमय, नत्रयुक्त, चरबीयुक्त, क्षार, जीवनसत्त्वे व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्त्वे आपल्याला ताज्या भाज्यांमधून मिळतात. आपल्या शरीराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्त्वे गरजेची आहेत. अंडी, दूध पिणे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते. यामुळे आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. दुधामुळे पचन होण्यास मदत होते. अशी मिळू शकतात जीवनसत्त्वे... प्रथिनांच्या पचनासाठी ‘अ जीवनसत्त्व, कर्बोदकांच्या पचनासाठी ‘ब’ जीवनसत्त्व, तर स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी ‘ई’ जीवनसत्त्वाची गरज असते. हाडांच्या बळकटीसाठी ‘ड’ जीवनसत्त्व, रक्तासाठी ‘क’ जीवनसत्त्व आपल्याला आहारातून मिळणे गरजेचे असते. या सर्व जीवनसत्त्वांची गरज आपणास विविध पालेभाज्या आणि कडधान्यांतून भागवता येते.