बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हलगर्जीपणा करत मास्क न वापरता लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत.
सीसीटीव्हीची मागणी गढी : येथे बीड, गेवराई व माजलगावला जोडणाऱ्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रस्त्यावर वर्दळ असते. सुरक्षेमुळे कॅमेऱ्यांची मागणी होत आहे.
दुचाकी चोरीत वाढ
बीड : येथील अनेक शासकीय कार्यालय परिसरात दुचाकी चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाहन परत मिळेल याची खात्री नाही. यामुळे अनेकजण तक्रारही नोंदवत नाहीत.
कीटकनाशक फवारणी
बीड : खरीप हंगामातील पिकांना परतीच्या पावसामुळे मोठा फटका बसला होता. मात्र, अशाही स्थितीत तालुक्यात काही पीक चांगल्या स्थितीत आहेत. सध्या चांगले असलेल्या पिकांवर फवारणीसाठी शेतकरी वेळ देत आहेत.
मुख्य रस्त्यावर वीजखांब
बीड : शहरातील बार्शी रोडवरून तुळजाई चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच वीजपुरवठा करणारे खांब आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. रस्ता करताना पालिका व महावितरणकडून याचे कसलेच नियोजन झाले नसल्याचे दिसत आहे.