शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
"अशा घोषणा लोकांना आवडणार नाहीत"; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध
3
"काही मशिनमध्ये गडबड होण्याची शक्यता! असं परदेशी माणूस म्हणतोय"; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
4
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
5
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
6
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
7
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
8
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
9
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
10
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
11
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
12
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
13
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
14
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
15
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर
16
कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा
17
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
19
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
20
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

विवस्त्र करून महिलेची धिंड काढणारे नऊ गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 4:24 AM

भावाचे प्रेमसंबंध जुळवून आणल्याच्या संशयावरून एका महिलेला विवस्त्र करून धिंड काढल्याची संतापजनक घटना शिरूर कासार तालुक्यातील वरंगळवाडी येथे शुक्रवारी सकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : भावाचे प्रेमसंबंध जुळवून आणल्याच्या संशयावरून एका महिलेला विवस्त्र करून धिंड काढल्याची संतापजनक घटना शिरूर कासार तालुक्यातील वरंगळवाडी येथे शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात पाच महिलांसह नऊ अटक करण्यात आली आहे.मारोती रघुनाथ सटले, बबन रघुनाथ सटले, संजय आश्रुबा इंगोले, अंगद राम इंगोले, कुंता बबन इंगोले, लंका मारोती सटले, रेखा संजय इंगोले, सुरेखा बबन इंगोले व झुंबर शहादेव दाताळ अशी आरोपींची नावे आहेत. पीडित महिला, तिचा पती हे मुलासोबत वरंगळवाडी येथे राहतात. मारोती सटले यांचे ते नातेवाइकही आहेत.पीडितेच्या भावाचे आणि सटले कुटुंबातील मुलीचे प्रेमसंबंध जुळले. ही बाब समजल्यावर तिच्या आई-वडिलांनी २ आॅगस्ट रोजी दुपारी पीडितेला व तिच्या पतीला मारहाण केली होती. यावेळी पीडितेच्या पतीने माफी मागत हे प्रकरण मिटविले होते. मात्र, त्यांचा राग शांत झाला नव्हता.पीडितेचे पती शुक्रवारी शिरूर येथे गेले असता मारोतीसह अन्य आठजण त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी पीडित महिलेला विवस्त्र करून चावडीपर्यंत चपलांनी मारहाण करीत तिला फरफटत नेले. पीडितेची सासू सोडविण्यासाठी गेली असता त्यांनाही नाल्यात ढकलून देण्यात आले. त्यांची मुले मोठमोठ्याने ओरडत होती, मात्र मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. शिवाय, सामूहिक अत्याचार करण्याची धमकीही तिला दिली. पीडितेचे पती घरी आल्यावर हा सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.