लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यातील आष्टी, कडा, धामणगाव, धानोरा आदी गावांसह तालुक्यात गणरायांचे घरोघरी उत्साहात आगमन झाले. कोरोनामुळे यंदाही ना ढोलताशांचा दणदणाट, ना गुलालाची उधळण, ना मिरवणुका दिसल्या. परंतु गणपती बाप्पा मोरया.. च्या जयघोषात बाप्पांचे आगमन झाले. या वेळी भक्तांचा उत्साह दिसून आला. बाजारपेठेतही गर्दी दिसून आली.
आष्टी तालुक्यातील कडा, आष्टी, धामणगांव, धानोरा येथे गणेशमूर्ती घेण्यासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर सकाळपासूनच गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र, रस्त्यावर नेहमीसारखी गर्दी नसली तरी भक्तांचा उत्साह मात्र कायम असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून उत्सवावर कडक निर्बंध आहेत. मात्र कोरोनाच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करीत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. भक्तही कोरोना नियमांचे नियमांचे पालन करताना दिसत आहेत.
...
आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
कोरोनाचे नियम पाळून गणपती उत्सव साजरा करा, तोंडाला मास्क लावा. कोरोना टाळा, सुरक्षित अंतर ठेवा. सुरक्षा अबाधित राखण्यासाठी प्रशासन सतर्क असून कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले आहे. लवकरात लवकर कोरोना जावो, अशी प्रार्थना बाप्पाकडे गणेशभक्तांनी केली आहे.
...
पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात
बाप्पाच्या स्वागतासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवातील शांततेसाठी उपद्रवी व्यक्तींना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. नियमांचे पालन करीत मिरवणूक न काढता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे मंडळांनी व घरोघरी नागरिकांनी पालन करून गणेशोत्सव साजरा करावा. पोलीस प्रशासन सतर्क आहे. चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-सलिम चाऊस, पोलीस निरीक्षक, आष्टी.
...
100921\img-20210910-wa0362_14.jpg
आष्टी बाजारपेठेत झालेली गणेश भक्तांची गर्दी.