शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

टीकेची पर्वा नाही, परळीकर माझी पाठही थोपटतात-धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2021 4:27 PM

Dhananjay Munde: राज्यात व केंद्रात सत्ता असताना हे काम करता आले नाही असे सांगून धनंजय मुंडे यांनी  नाव न घेता टोला लगावला.

परळी : शहरातील रस्ते व भूमिगत नाल्यांचे कामही प्रगतीपथावर आहे, या कामास थोडा उशीर होत आहे त्यावरून अनेकदा मला टीकेचा सामना करावा लागतो आहे. मी टीकेचा धनी होत आहे परंतु  टीकेची  मी पर्वा करणार नाही कारण याच परळीकरानी  दोन वर्षापूर्वी आपल्याला दणदणीत मताने मतदान केले आहे. येथील नागरिक माझी पाठ ही थोपटतात .असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केले आहे.

धनंजय मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून परळी शहरातील काळाराम मंदिर येथे स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृहाचे लोकार्पण शनिवारी मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुरातन मंदिर असलेल्या आंबेवेस भागातील काळाराम मंदिरात पहिल्या मजल्यावर सभागृह उभारण्यात आले असून, स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी ट्रस्ट च्या माध्यमातून मंदिर जीर्णोद्धार, सजावट, सुशोभीकरण आदी कार्य पूर्ण करण्यात आले आहे. यावेळी पुढे बोलताना मंत्री मुंडे यांनी आपल्या बालपणातील परळी शहरातील जुन्या गाव भागातील आठवणींना उजाळा दिला. स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी यांनी परळी शहरात अनेकांना मदत केली. ज्यांचे मन खूप मोठे असते, त्यांना कधीच काही कमी पडत नसते. आज स्व. माणिकराव यांचे नातू माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी हे आपल्या आजोबांच्या समाजकारणाचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवत आहेत, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

परळी मतदारसंघाची देशात ख्याती होईल...परळी मतदारसंघात वैद्यनाथ विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यातील 25 कोटी रुपये खर्चून भव्य भक्त निवास उभारणीच्या कार्यास सुरुवात झाली आहे. शहरातील रस्ते व भूमिगत नाल्यांचे कामही प्रगतीपथावर आहे, त्यावरून अनेकदा आम्हाला टीकेचा सामना करावा लागतो आहे. परंतु दर्जेदार काम करून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे. काहीजण शहरातील रस्ते व नाल्याच्या कामावरून माझ्याविषयी टीका करतात व कुजबुज चालू असते त्यामुळे मला उचक्या लागतात असे सांगून धनंजय मुंडे यांनी परळी -अंबाजोगाई मार्गावरील रस्त्याचे काम आपल्या काळात पूर्ण केले राज्यात व केंद्रात सत्ता असताना हे काम करता आले नाही असे सांगून धनंजय मुंडे यांनी  नाव न घेता  येथील भाजपाच्या नेतृत्वाला टोला लगावला. भविष्यात परळी शहरातून जाणाऱ्या विविध पालखी मार्गाचा तिरुपती बालाजी देवस्थान येथील रस्त्याप्रमाणे विस्तार करणे प्रस्तावित आहे. परळी मतदारसंघाची ख्याती देशभरात विकसित शहर म्हणून यावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.कॉ.चे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. तसेच यावेळी नीट परीक्षा व मेट्रो रेल्वेच्या परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा व नियमित रक्तदान करणाऱ्या जोडप्यांचा ना. मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रा.कॉ. चे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अण्णा टाक, ज्येष्ठ नेते सोमनाथ अप्पा हालगे, डॉ. सुरेश चौधरी, वासुदेव पाठक, श्रीकांत मांडे, शिवसेना तालुका अध्यक्ष व्यंकटेश शिंदे आदींनीही आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सोमनाथअप्पा हालगे, अजय मुंडे, बाळासाहेब देशमुख, चंदुलाल बियाणी, डॉ.सुरेश चौधरी, सुरेश टाक, तुळशीराम पवार, वैजनाथ सोळंके, व्यंकटेश शिंदे, राजाभैय्या पांडे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, धर्मराज खोसे, श्रीकांत मांडे, अमर देशमुख, जाबेर खान पठाण, अय्युबभाई पठाण, वहाज्जोद्दीन मुल्ला, उत्तमराव देशमुख, राजेश विभूते, डॉ जे जे देशपांडे, प्रकाश जोशी, वासुदेव पाठक, नारायणराव गोपणपाळे, रामदास महाराज रामदाशी, शंकरप्पा मोगरकर, अनंतराव भातांगळे, उत्तमराव देशमुख, प्रभाकर देशमुख, चेतन सौन्दळे, वैजनाथ बागवाले, भालचंद्र तांदळे, देविदासराव कावरे, सोपानराव ताटे, जगदीश चौधरी विठ्ठलअप्पा चौधरी, रवींद्र परदेशीविजय भोईटे, गोपाळ आंधळे, राजाखान गुत्तेदार, श्रीकृष्ण कराड, अनिल अष्टेकर, गोविंद कुकर, राजेंद्र सोनी, जयराज देशमुख, अझिज कच्छी, महावीर संघई, सुभाष नाणेकर, दत्ताबुआ पुरी, विलासराव ताटे, निळकंठराव पुजारी, शरद कावरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडे