परळी:राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारसंवाद यात्रेनिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परळीत आले होते. जयंत पाटील येणार म्हणून परळीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परळीकरांनी मोठी गर्दीही केली होती. यावेली बोलताना जयंत पाटलांनी धनंजय मुंडे यांचे भरभरुन कौतुक केलं. 'परळीकरांचे प्रेम बघता पुढील दहा निवडणुकादेखील धनंजय मुंडे यांना कोणी थांबवू शकत नाही', असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.
Afghanistan: वडील बंडखोरांच्या टोळीत सामील झाल्याचा संशय, लहान मुलाला लटकवलं फासावर
यावेळी जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीने परिसंवाद यात्रा सुरू केली होती, पण कोरोना वाढल्यामुळे यात्रा थांबवण्यात आली. पण, आता कोरोना थोडाफार संपुष्टात आल्यावर यात्रा सुरू झाली आहे. परळीत आल्यावर कोरोना संपुष्टात आल्याचं वाटलं. माझ्या लग्नातही इतके लोकं नव्हते, तितके तुम्ही माझ्या स्वागतासाठी आलात. तुम्हा असंख्य तरुणांच धनंजय मुंडेवरील प्रेम मी आज परळीत पाहिलं. पुढच्या दहा निवडणुकादेखील मुंडे यांची कोणी थांबवू शकत नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
'दिल्लीत झालेली दंगल पूर्वनियोजित होती'; दिल्ली उच्च न्यायालयाची टिपण्णी
परळी पुढे जाणार, कारण इथल्या नेत्यात जोरपाटील पुढे म्हणाले, धनंजय मुंडे विरोधीपक्ष नेते होते, तेव्हा महाराष्ट्रतल्या कुठल्याही नेत्याने घोटाळा केला की त्याचा करायचे. बारामती पवारांच्या मागे उभी राहिली म्हणूनच विकास झाला. तशाचप्रकारे तुम्ही धनंजय मुंडेंच्या मागे उभे रहा. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम मुंडे भविष्यकाळात करतील. परळीदेखील फार पुढे जाण्याची शक्यता आहे, कारण इथल्या नेत्यात जोर आहे, असंही पाटील म्हणाले.