माजलगाव ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील पाच प्राथमिक केंद्रातील लस गुरुवारी अचानक संपल्याने रांगेत थांबलेल्या वृद्धांना परत घरी जावे लागले. शुक्रवारी सकाळीदेखील वृद्ध नागरिक वाहनांत बसून येत होते, मात्र तेथे आल्यानंतर लस संपल्याचे उत्तर मिळताच त्यांना परत घरी जाण्याची वेळ आली.
सर्वसामान्य नागरिक लस घ्यायला येताना रिक्षात आले पण ग्रामीण रुग्णालयांतून परत जाताना रिक्षा मिळाल्याने वृद्ध नागरिकांवर चालत जाण्याची वेळ आली.
दोन दिवसांपासून लस संपलेली असताना येथील आरोग्य विभागाने कोणालाच कळवले नाही. त्यामुळे नागरिकांना परत जावे लागले.
पहिल्या डोससाठीची लस ही संपली असून सोमवार नंतर लस उपलब्ध होईल. त्यानंतर लसीकरण होईल. सध्या लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे.
-- डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी, माजलगाव
===Photopath===
190321\img_20210319_110708_14.jpg
===Caption===
लस साठा संपल्याने माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शुकशुकाट होता.