बीड जिल्ह्यात या योजनेत ५ लाख २२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी आहे. केंद्र शासनाने या लाभार्थ्यांचा माहिती केंद्रीय आयकर विभागाच्या माहितीशी संलग्न केल्यावर जिल्ह्यातील ७ हजार १७८ लाभार्थी आयकर भरत असल्याचे समोर आले आहे. तसेच २० हजार ८०४ लाभार्थी विविध कारणांनी अपात्र ठरले आहेत. या अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून १९ कोटी १० लाख ८ हजार रुपये एवढा निधी मिळालेला आहे. हा निधी वसूल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. यात १ कोटी ९९ लाख १२ हजार रुपये एवढी रक्कम वसूलही झाली आहे. उर्वरित रक्कमही वसूल करण्याची माहिती तहसील पातळीवर राबविण्यात येत आहे. या सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने समन्वयक संतोष राऊत यांनी केले आहे.
पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वसुलीसाठी नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 5:04 AM