बीड : जिल्ह्यात मगील काही महिन्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी यसह इतर घटना वाढल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी रात्रीची गस्त घालत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी अनेक ठिकाणी केल्या होत्या. याची दखल घेत अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी विभागातील सर्वच १३ ठाणेप्रमुखांना शनिवारी नोटीस बजावली आहे.चोºया, घरफोड्या व इतर रात्रीचे अवैध धंदे या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून रात्री गस्त घातली जाते. मात्र, अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी हे रात्रीच्या गस्तीवर कर्तव्यात कसूर करतात. त्यामुळे या घटनांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. अशाच घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे गेवराईत थेट आ. लक्ष्मण पवार यांनी पोलीस ठाणेच नक ो अशी भूमिका घेत मोर्चा काढला होता. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते.रात्र गस्तीवर असणा-या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख बजावून चोरी, घरफोडी यासह इतर गुन्हे रोखण्याचे आदेश देखील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सर्व ठाणे प्रमुखांना दिले आहेत.‘जीपीएस’द्वारे पोलीसांवर लक्षरात्र गस्तीवरील सर्व गाड्यांना जीपीएस प्रणाली बसवलेली आहे. काही गाड्यांमधील ही यंत्रणा खराब झाली होती.ती पुन्हा कार्यान्वीत केली असून, रात्र गस्तीवरील पोलीस गाड्यांवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यातयेणार आहे.रात्र गस्तीवेळी कर्तव्यात कसूर न करण्याचे आदेश देखील संबंधितांना दिले आहेत. अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी ‘लोकमत’ला बोलताना दिली.
रात्रीची गस्त न घालणाऱ्या १३ ठाणे प्रमुखांना बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:17 AM
जिल्ह्यात मगील काही महिन्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी यसह इतर घटना वाढल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी रात्रीची गस्त घालत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी अनेक ठिकाणी केल्या होत्या. याची दखल घेत अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी विभागातील सर्वच १३ ठाणेप्रमुखांना शनिवारी नोटीस बजावली आहे.
ठळक मुद्देअपर पोलीस अधीक्षकांची कारवाई । नागरिकांनी केल्या तक्रारी