शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

आता आश्रमशाळा शिक्षकांनाही ७ वा वेतन आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 7:01 PM

बीडमधील यशस्वी प्रयोगानंतर राज्यातील सर्व आश्रमशाळांत होणार अंमलबजावणी

ठळक मुद्देबीडमधील ११० शिक्षकांना वेतन अदा 

बीड : सातव्या वेतन आयोगानुसार अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांना वेतन देण्याचा प्रायोगिक तत्त्वावर बीड जिल्ह्यात राबविलेला प्रयोग यशस्वी झाल्याने याची आता राज्यभर अंमलबजावणी होणार आहे. 

राज्यातील अनुदानित आश्रमशाळा शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगातून वगळण्यात आले होते. त्यानंतर शिक्षकांनी आंदोलने केली. याची दखल घेत शासनाने  सुरूवातील प्रायोगिक तत्त्वावर ठराविक शाळा निवडून त्यांना वेतन देता येते का? आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण होते का? याची चाचपणी करण्यास सांगितले. मात्र, राज्यातील एकाही जिल्ह्याने याला प्रतिसाद दिला नाही. बीडचे सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी हे आव्हान पेलले. त्यांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावून १५ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली.यासाठी बीडमध्ये ४६ पैकी ६ शाळा निवडल्या होत्या. शुक्रवारी यातील ११० शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा करण्यात आले. इतर ४० शाळांमधील शिक्षकांनाही याचपद्धतीने वेतन दिले जाणार आहे. हा सर्व अहवाल सचिवांना दिला जाणार आहे. त्यानुसार पुढील महिन्यात राज्यातील सर्व आश्रमशाळा शिक्षकांना ७ व्या आयोगानुसार वेतन दिले जाईल. डॉ. मडावी यांना यासाठी लेखापाल, दिलीप कलकुट्टी आणि प्रमोद सानप यांनी सहकार्य केले.

शिक्षकांच्या लढ्याला यशसातव्या आयोगानुसार वेतन द्यावे, यासाठी शिक्षकांनी आंदोलने केली. निवेदनेही दिली. याला यश मिळाले आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. आता हे वेतन लवकरात लवकर खात्यावर कधी वर्ग होते, याची उत्कंठा शिक्षकांना लागली आहे. प्रायोगिक तत्त्वावर बीड जिल्ह्यातील ६ शाळांना निवडले होते. यात यश आले आहे. बीडमधील इतर शाळांमधील शिक्षकांनाही याच महिन्यात वेतन अदा केले जाईल. राज्यात देण्यासाठी सचिवांना अहवाल पाठविला जाणार आहे. 

आमच्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यात यश मिळाल्याने समाधानी आहोत.  

- डॉ.सचिन मडावी, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, बीड

टॅग्स :State Governmentराज्य सरकारBeedबीडfundsनिधीTeacherशिक्षक