शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

बीड पोलिसांचा १०० क्रमांक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:27 AM

कुठलीही घटना घडली किंवा गुन्हा घडताना दिसला की सामान्य माणूस तातडीने पोलिसांचा १०० क्रमांक डायल करतो. परंतु मागील अनेक दिवसांपासून बीड पोलिसांचा १०० हा क्रमांक बंद आहे.

ठळक मुद्देबिल भरूनही यंत्रणेचे दुर्लक्ष; संपर्क साधण्यास अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कुठलीही घटना घडली किंवा गुन्हा घडताना दिसला की सामान्य माणूस तातडीने पोलिसांचा १०० क्रमांक डायल करतो. परंतु मागील अनेक दिवसांपासून बीड पोलिसांचा १०० हा क्रमांक बंद आहे. विशेष म्हणजे दूरध्वनी कंपनीकडे बिल भरूनही फोन सुरू केला जात नसल्याचे समोर आले आहे. हा क्रमांक बंद असल्यामुळे परिसिरात घडलेल्या घटना, गुन्हे माहिती असूनही देता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आपल्यापैकी अनेकांना १००, १०१, १०३, १०८ हे फोन नंबर परिचयाचे असतात. पोलीस, फायर ब्रिगेड, रेल्वे, अ‍ॅम्ब्युलन्स, आप्तकालीन मदत कक्ष यांचे हे क्रमांक आहेत. विविध घटनांची माहिती देण्यासाठी सर्वसामान्य लोक या क्रमांकावर संपर्क साधतात. नागरिकांकडून येणारी माहिती पोलिसांना पोहोचवण्यासाठी हा महत्त्वाचा दुवा आहे. ही सेवा २४ तास सुरू असते. हा क्रमांक कंट्रोल रूममध्ये जोडलेला असतो. कंट्रोलरूम हे पोलीस दलाचे दळणवळणाचे साधनच असते. परंतु मागील अनेक दिवसांपासून हा क्रमांक बंद असल्याने हे दळणवळण (फोन येणे-जाणे) बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह पोलिसांनाही अडचण निर्माण झाली आहे. हा क्रमांक सुरू करावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरू लागली आहे.

पोलीस ठाण्यांचे फोन बंदचजिल्ह्यातील निम्याहून अधिक पोलीस ठाण्यांमधील दूरध्वणी (लॅण्डलाईन) बंद आहेत. ग्रामीण भागात तर अधिकारी, कर्मचा-यांची मोबाइल क्रमांक नसल्याने संपर्क साधण्याचे मोठे आव्हान असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठाण्यांसह मदत क्रमांक सुरू करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.फोन सुरू झालेला नाहीसंबंधित कंपनीकडे सर्व फोनचे बिल भरलेले आहे. परंतु अद्यापही फोन सुरू झालेला नाही. याबाबत पत्रव्यवहार करून पाठपुरावाही केला आहे, परंतु अद्याप दखल घेतली नाही. जी सेवा मिळते, ती सुद्ध खुप स्लो आहे. लवकरात लवकर क्रमांक सुरू करण्यासाठी कार्यवाही केली जाईल.- जी.श्रीधरपोलीस अधीक्षक, बीड