परळी शहरात व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये ही रुग्णांची उपचाराची सोय करण्यात आली आहे व विविध पक्ष व इतर सामाजिक संघटना जनजागृतीचे काम करीत आहेत, पोलीस प्रशासन सतर्क होऊन काम करीत आहे. शहरातील डॉक्टर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य, महसूल अधिकारी, शिक्षक हे योग्य समन्वय साधून काम करीत आहेत. पालकमंत्री धनजय मुंडे यांनी ही खूप बारकाईने पहिल्यापासूनच लक्ष देऊन उपाययोजना केल्या. प्रशासन सतर्क केले व कार्यकर्त्यांना मदतीसाठी सक्रिय केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा शिवसेना व इतर पक्षाचे कार्यकर्तेही बाधित रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे या कोरोनाच्या संकटात कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेबरोबरच ‘सेवाधर्म’ या माध्यमातून दिवस-रात्र एक करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर त्यांनी या ‘सेवाधर्म’ उपक्रमाची जबाबदारी सोपविली. धनंजय मुंडे यांनी उपक्रमातून रुग्णांना नाष्टा, भोजन पुरवणे, मदतीसाठी प्रत्येक खासगी रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन स्वयंसेवक तैनात केले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी जाताना स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घेता यावी, यासाठी कोरोना सुरक्षा किट, वाटप सुरू केले आहे.
- राहुल विलासराव ताटे परळी.
माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या संकल्पनेतून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने येथील शिवाजी चौकात शंभर बेडचे आयसोलेशन (विलगीकरण) सेंटर सुरू करण्यात आले. यामध्ये निवास, भोजन, औषधोपचार, तज्ज्ञ डाॅक्टर्स डून वेळोवेळी तपासणी, अशी रुग्णांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. कोणत्याही रुग्णाला एक रुपयादेखील खर्च करावा लागत नाही, सर्व व्यवस्था प्रतिष्ठानकडून मोफत केली जात आहे. आतापर्यंत या सेंटरमध्ये ९० रुग्ण दाखल झाले होते, त्यापैकी ५५ रुग्ण ठणठणीत बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत.
- राजेंद्र ओझा भाजपा शहर उपाध्यक्ष परळी
परळी तालुक्यासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून ही महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सकारात्मक राहा. एकमेकांना आधार द्या. हे संकट लवकरच संपेल. त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करावे.
रानबा गायकवाड
लेखक, परळी