शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

'भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर आमच्या बाजूने बोला'; ओबीसी नेते लक्ष्मण हाके थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 10:22 IST

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत.

गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे. तर दुसरीकडे  काही दिवसापासून ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 'अभिवादन यात्रा' सुरू केली आहे. ही यात्रा  बीडमधील भगवान गडावर पोहोचली आहे. यावेळी हाके यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

'राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो, या घटना..."; फडणवीस-ठाकरेंच्या भेटीवर भाजपा नेत्याचे सूचक वक्तव्य

काही दिवसापूर्वी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा डीएनए ओबीसी असल्याचे भाष्य केले होते. यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, सिंदखेडराजापासून रॅली सुरू झाली आहे. गावोगावी चांगला प्रतिसाद मिळत आहे. देवेंद्र फडणवीस जर ओबीसी भाजपचा डीएनए आहे म्हणत आहेत, तर ते बोलत का नाहीत. आम्ही त्यांना वेगळं काही मागत नाही. आमच्या आरक्षणाच्या बाजून फक्त बोला. तुम्ही संविधानीक पदावर आहात, आमच्या हक्क आणि संरक्षणावर बोलो. मराठा आरक्षणाच आलं की म्हणायचे आम्ही तुम्हाला आरक्षण देतो, संवेदनशील काम करतो आणि ओबीसी आरक्षणाचा विषय आला की त्यांना म्हणायचे तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. म्हणजे हे दोन्ही वेळेला कसं होऊ शकतं, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला. 

"मराठा समालाजाला ओबीसीतून आरक्षण कसं देणार आहात याच उत्तर आम्हाला पाहिजे आहे. एका बाजूला जरांगे म्हणतात आम्ही ओबीसीमध्ये घुसलोय. तर दुसऱ्या बाजूला सरकार म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. नक्की खरं कोण बोलतंय, ही आमची संभ्रम दूर करा एवढीच आमची मागणी आहे, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.   

जरांगे पंतप्रधान की राष्ट्रपती? 

पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे काय राष्ट्रपती आहेत का देशाचे पंतप्रधान आहेत? जरांगे यांनी काय सभागृहात ठराव घेतला आहे का, ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा. मनोज जरांगे नावाचा माणूस बेकायदेशीर घटनाविरोधी आरक्षण मागत आहे. ते कधीही मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आमच्या जीवनात माती कालवण्याचं काम करू नये, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आताच्या मुख्यमंत्र्यांकडून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची मिलीभगत आहे, असा गंभीर आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आम्ही अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करण्यासाठी आंदोलन करत आहोत. तानाजी सावंतसारखे मंत्री जरांगेच्या उपोषणाला भेट देतात आणि मी मराठा म्हणून आलो, असे बालिश विधान करतात. आपण १२ करोड जनतेचे मंत्री, मुख्यमंत्री आहोत हे विसरून जातात. शिंदे सरकार ओबीसींना डावलत आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBC Reservationओबीसी आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील