शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
9
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
10
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
11
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
12
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
13
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
14
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
15
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
16
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
17
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
18
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
19
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
20
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

सतत चार महिने रात्रंदिवस एक करून मिळवले ओबीसी आरक्षण- शिवराजसिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 7:11 AM

दु:खाची जाणीव असेल तर मार्ग निघतो

- अनिल लगडगोपीनाथ गड/परळी (जि.बीड) : कोणी माझ्यासोबत आहे की नाही हे न पाहता मी न्यायालयात गेलो. प्रशासनाला कामाला लावले. माहिती जमा केली. चार महिने रात्रंदिवस एक केला. ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतरच शांत बसलो. ओबीसींच्या दु:खाची जाणीव असेल तर आरक्षणासाठी नक्कीच मार्ग निघतो, असा टोला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात  चौहान म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी केली होती. तेवढ्यात ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचे कळले. आम्ही निवडणुका होणार नाहीत, असे जाहीर केले.  कोर्टात गेलो. आयोगाला सर्व्हे करण्यास भाग पाडले. रात्रभर आयोगासोबत बैठक घेऊन किती टक्के आरक्षण पाहिजे, यावर विचारविनिमय केला. 

मुंडेंनी नवा इतिहास रचला

स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपाला गावोगावी पोहोचविले. मी थकणार नाही, थांबणार नाही, कोणासमोर झुकणार नाही, असे मनाशी ध्येय ठेवून अहोरात्र मेहनत घेतली. राज्यात संघर्ष यात्राद्वारे काँग्रेसला सत्तेवरून पायउतार करण्यास भाग पाडले. सामान्य कुटुंबातील ऊसतोड मजुरांचे प्रश्न सोडविले. मुंडे हे कायम जनतेसाठी जगले ते नवा इतिहास रचून गेले. त्यांना मी कधीही विसरणार नसल्याची भावना चौहान यांनी व्यक्त केली. 

धनंजय मुंडे यांनी घेतले समाधी दर्शन 

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन सकाळीच मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. माजी आ. अमरसिंह पंडितसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणPankaja Mundeपंकजा मुंडे