तालुक्यातील लाडेवडगाव शिवारातील वनव्याचा माळ गट नंबर १२१ या स्वतःच्या मालकीच्या शेतात शेत नांगरण्यासाठी नवनाथ विश्वनाथ शेप हा शेतकरी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्यासुमारास गेला होता. त्यासुमारास कारभारी किसन शेप व बबन ऊर्फ पांडुरंग कारभारी शेप यांनी तेथे जाऊन तुम्ही हे शेत नांगरायचे नाही. हे शेत आमचे आहे, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांच्याशी वाद न घालता नवनाथ शेप पोलिसात तक्रार देण्यासाठी जाताना, गावातील हनुमान मंदिराजवळ अडवून बबन याने शिवीगाळ करत डोक्यात दगड मारल्याने नवनाथचे डोके फुटल्याने तो जखमी झाला. त्यावेळी कारभारी शेप यानेही दगडाने मारहाण करून मुक्कामार दिला. त्यावेळी जवळच लहू राम लटपटे, रामहरी तुकाराम लटपटे, संदीपान तुकाराम लटपटे व डुगा दिलीप लटपटे हे हातात काठ्या व इतर हत्यार घेऊन उभे राहून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नवनाथ शेप यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारभारी शेप, बबन शेप, लहू लटपटे, दिलीप लटपटे, रामहरी लटपटे, संदीपान लटपटे व डुगा दिलीप लटपटे यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल रामधन डोईफोडे तपास करत आहेत
शेतीच्या वादातून एकाचे डोके फोडले; सातजणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:35 AM