डाॅ. सुरेंद्र कलंत्री यांनी कृषितज्ज्ञ रामेश्वर चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली मोसंबीची लागवड करण्याचे नियोजन केले. लागवडीसाठी आडोळी येथील दादासाहेब वाघ यांच्या नर्सरीतून रोपे आणली. झिगझाग पध्दतीने वीस बाय वीस व आतल्या भागामध्ये वीस बाय दहाप्रमाणे लागवड केली. या नव्या पद्धतीमुळे १२० ऐवजी २१० झाडे बसतात. रोगराईमुळे काही झाडे वाया गेली तरी जास्त नुकसान होत नाही, या दृष्टीने कृषितज्ज्ञ चांडक यांचे मार्गदर्शन मोसंबी लागवडीसाठी खूप मोलाचे ठरले.
मोसंबी लागवड केल्यापासून चौथ्या वर्षी मोसंबीला फळे लागतात. गतवर्षी ३३ टन मोसंबीचे उत्पादन कलंत्री यांनी घेतले. यंदा त्याच चार एकरमध्ये ५० टन उत्पादनाची अशा त्यांना आहे. चार एकरातील मोसंबीबागेसाठी फवारणी, खते, आंतरमशागतीवर ५० हजार रुपये खर्च होतो. चांगला भाव मिळाल्यास उत्पन्न अडीच लाखांपर्यंत मिळू शकते. खर्च वजा जाता दोन लाख रुपये या फळबाग लागवडीतून नफा मिळू शकतो. दुष्काळ व टंचाईचा फटका बसणार नाही, याबाबत दूरदर्शीपणे नियोजन केले. तीन वर्षांपूर्वी या मोसंबीच्या बागेसाठी एक कोटी लिटर पाणी बसेल एवढे शेततळे तयार केले आहे. तर इतर एकूण ६ बोअर व विहिरींचे इतर स्त्रोत सुलभ केले. या आधारावर मोसंबीची बाग डॉ. कलंत्री यांनी जाेपासली आहे. मोसंबीच्या फळबागेसाठी जास्त करून सेंद्रिय खतांचा वापर ते करतात. कधी कधी गरजेनुसार रासायनिक खते वापरावी लागतात. मोसंबीची फळबाग ही साधारणत: दहा वर्षे टिकते. मात्र आमच्या शेतातील ही मोसंबीची बाग बाराव्या-तेराव्या वर्षीही चांगल्या प्रकारे जोपासल्याचे डॉ. कलंत्री यांनी सांगितले.
तीन वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने मोसंबीची बाग अडचणीत आली होती. मात्र उपळी येथील श्याम इंदानी यांच्या टँकरद्वारे उपळी कुंडलिका तलावातून पाणी पुरवले व बाग जिवंत ठेवली. तेलगाची मोसंबी लातूरच्या बाजापेठेतून राज्यात व राज्याबाहेर पोहचली आहे. काही व्यापारी थेट शेतात येऊन मोसंबीची खरेदी करतात.
काळजी घेतली तर नुकसान नाहीच
ज्या शेतकऱ्यांकडे भरपूर प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी मोसंबीचे पीक घ्यावे. कारण वर्षातून दोन वेळेस मोसंबीला फळे लागतात. एक वेळ वाया गेले तरी दुसऱ्या वेळेचे फळ शेतकऱ्यांच्या हाती शंभर टक्के लागते. त्यामुळे मोसंबीची बाग नुकसानीत जात नाही. या फळबागेत अंतर्गत इतर पिके घेऊन फळबागेसाठी होणारा इतर खर्चदेखील निघतो, असे डॉ. सुरेंद्र कलंत्री म्हणाले.
तेलगावच्या मोसंबीला हवे विमाकवच
ज्यावेळी झाडांना मोसंबी फळे लागतात, त्यावेळी डासांमुळे फळे गळून खाली पडतात. मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र तेलगाव महसूल मंडलात मोसंबी फळ पीकविमा लागू करण्यात आलेला नाही. कारण १५ हेक्टरची अट असल्याने अद्यापही आम्हाला मोसंबीचा तेलगाव महसूल मंडलात पीकविमा मिळालेला नाही. शासनाने पाहणी करून या मंडलात मोसंबीसाठी फळ पीकविमा लागू करावा, अशी अपेक्षा मोसंबीची फळबाग करणारे शेतकरी करीत आहेत.
180921\18bed_3_18092021_14.jpg~180921\18bed_2_18092021_14.jpg
मोसंबी साठी एककोटी लिटर चे शेततळे~२१ एक्कर मोसंबी नगदी उत्पादन