बीड : तालुक्यातील येळंबघाट येथील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात अवघ्या एका दिवसाच्या पुरूष जातीच्या नवजात अर्भकाला अक्षरश: पिशवीत घालून रस्त्यावर टाकून माता फरार झाल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीसांनी सतर्कता दाखवत तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्या अर्भकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.येळंबघाट येथील एका मंगल कार्यालयाजवळ एका पिशवीतून बाळाचा आवाज येऊ लागल्याने काही ग्रामस्थांनी याची माहिती नेकनूर पोलिसांना दिली. त्यानंतर नेकनूर ठाण्याच्या महिला पोलीस रोहिणी गवते व संतोष राठोड यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत त्या नवजात शिशूला तातडीने वाहनातून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवले. सकाळी ९.२० वाजता त्याला जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षामध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरु केले. बाळाची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निगराणीखाली त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी दिली.
एका दिवसाच्या अर्भकाला पिशवीत घालून फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:27 AM
बीड : तालुक्यातील येळंबघाट येथील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात अवघ्या एका दिवसाच्या पुरूष जातीच्या नवजात अर्भकाला अक्षरश: पिशवीत घालून ...
ठळक मुद्देपोलिसांची सतर्कता : जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु; येळंबघाट येथील प्रकार