जिल्ह्यात रविवारी कोरोना चाचण्यांचाही वेगही वाढवण्यात आला. तब्बल १,१९२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात केवळ ४३ बाधित रुग्ण निष्पन्न झाले तर उर्वरित १,१४९ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १०, बीड ९, आष्टी ३, धारुर १, गेवराई ६, केज २, माजलगाव ७ परळी ४ व पाटोदा तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. शिवाय रविवारी एकाच दिवशी पहिल्यांदाच ५० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. तसेच रविवारी एक मृत्यूची नोंद झाली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजार ७८३ इतकी झाली आहे. पैकी १७ हजार ८५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ५७८ जणांचा मृत्यू झालेला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार व डॉ.पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.
कोरोनामुळे एकाचा मृत्यू तर ४३ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:39 AM