परळी (बीड ) : शहरातील ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन कर्ज घेऊन ते परतफेड करण्यासाठी खोटा धनादेश दिल्याच्या आरोपावरून एकास परळी न्यायालयाने तीन महिने कारावास व 25 हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा आज ठोठावली.
एका बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी ज्ञानोबा चौधरी यांनी ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन दिनांक 21.12. 2004 रोजी रूपये 10, 000 कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या परतफेडीकरिता पतसंस्थेला दिनांक.22.01.2007 रोजीचा रुपये 15,665 चा एका बँक शाखा परळीचा धनादेश दिला. सदर धनादेश न वटल्यामुळे ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन बालाजी अप्पाराव भोईटे यांच्यामार्फत परळी न्यायालयात कलम 138 नि.ई.अँक्टखाली फिर्याद दाखल केली.या प्रकरणाची सुनावणी परळी येथील न्यायालयाचे न्यायाधिश एम. जे. डौले यांचे समोर झाली. पतसंस्थेचा युक्तीवाद मान्य करून ज्ञानोबा चौधरी यास उपरोक्त शिक्षा ठोठावली. ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन अँड.आर.व्ही.गित्ते यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. वंसतराव फड यांनी सहाय्य केले.