लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया या आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या साथरोगांची लागण इतरांना होऊ नये, तसेच जिल्हा रूग्णालयातील गर्दी कमी व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यापुढे जिल्हा रूग्णालयात आता एका रूग्णासोबत एकच नातेवाईक असणार आहे. रूग्ण दाखल होताच रूग्ण व नातेवाईकाला पास दिली जाईल. आजपासून लगेच याची अंमलबजावणी केली जाणार आहे.जिल्ह्यात सध्या साथरोगांनी तोंड वर काढले आहे. त्यातच शुक्रवारपर्यंत ७ रूग्ण स्वाईन फ्ल्यूची लागण झालेले आढळले आहेत. पैकी पाच रूग्णांवर जिल्हा रूग्णालयातील स्वतंत्र कक्षात उपचार सुरू असले तरी हे रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पाचही महिला या प्रसुती झालेल्या आहेत. हाच धागा पकडून शनिवारी सकाळीच राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप औटे, उपसंचालक डॉ.हेमंत बोरसे बीडमध्ये दाखल झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडून त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. स्वतंत्र कक्षाला भेट देऊन पाहणी करीत रूग्णांशी चर्चा केली.दरम्यान शुक्रवारी दुपारी सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह सर्व खशजगी डॉक्टरांची तातडीची बैठक घेतली. त्यांना तत्काळ अहवाल देण्याच्या तसेच दाखल रुग्ण, लक्षणाबाबत सजग राहण्याच्या सूचना दिल्या.खाजगी रूग्णालयाने माहिती लपविली ?सतीश हरीदास जोगदंड (४५ रा. देविबाभुळगाव) यांना लक्षणे दिसू लागताच त्यांनी पहिल्यांदा चौसाळा व नंतर बीडमधील एका खाजगी रूग्णालयात उपचार घेतले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्यानंतर शवविच्छेदनादरम्यान त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. आता डॉ.थोरात, डॉ.पवार यांनी या खाजगी रूग्णालयाने शासनाला का कळविले नाही, आणि त्याच्यावर काय उपचार केले, याची माहिती मागविली आहे. माहिती दडवून ठेवणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.साथरोगांचा अहवाल पाठविण्याकडे दुर्लक्षखाजगी रूग्णालयात उपचार घेणारे रूग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळतात. अनेकवेळा ही रूग्णालये शासनाला माहिती देत नाहीत. तसेच अनेकवेळा खाजगी रिपोर्ट हे खोटे ठरत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शासकीय प्रयोगशाळेतूनच तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आता यापुढे जे रूग्णालय अहवाल किंवा माहिती देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे डॉ.थोरात व डॉ.पवार यांनी सांगितले.
एका रूग्णासोबत एकच नातेवाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:17 AM
स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया या आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या साथरोगांची लागण इतरांना होऊ नये, तसेच जिल्हा रूग्णालयातील गर्दी कमी व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यापुढे जिल्हा रूग्णालयात आता एका रूग्णासोबत एकच नातेवाईक असणार आहे. रूग्ण दाखल होताच रूग्ण व नातेवाईकाला पास दिली जाईल. आजपासून लगेच याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
ठळक मुद्देआजपासून अंमलबजावणी : बीडच्या जिल्हा रूग्णालयातील गर्दी होणार कमी; नागरिकांकडून सहकार्याचे आवाहन