मागील एक महिन्यापासून कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन नवनवीन नियमावली जाहीर करत आहे. पंरतु त्याची कडक अंमलबजावणी करताना प्रशासन दिसून आले नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पक्षाच्या बैठका, मेळावे, निवडणुकीतील विजयाचे आनंदोत्सव कोणतेही नियम अटी न पाळता मोठ्या संख्येने घेण्यात आले. याकडे प्रशासनाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. काही दिवसांपूर्वी सर्व व्यवसाय संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत बंद रहातील, असा आदेश काढण्यात आला परंतु अनेक दुकाने, हॉटेल, धाबे हे संध्याकाळी सात नंतर सुरु असायचे. याला कुठेही जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध केला नाही. स्वत: घालून दिलेल्या नियम व अटींची कडक अंमलबजावणी करण्यास जनतेस भाग पाडले असते तर आज संपूर्ण लाॅकडाऊनची करण्याची गरज जिल्हा प्रशासनाला भासली नसती . गेल्या वर्षभरापासून चालू असलेल्या लाॅकडाऊनच्या खेळामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अनेक मजूर कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हे लाॅकडाऊन लागले आहे, असा आरोप हिंगे यांनी केला.
हे लाॅकडाऊन प्रशासनाने पाच दिवसात मागे घेऊन नियम व अटी, कडक निर्बंध यांच्या अंमलबजावणीसाठी लक्ष द्यावे, जेणेकरुन संपूर्ण लाॅकडाऊनची गरज भासणार नाही. अन्यथा वंचित बहुजन आघाडी सर्व व्यापारी लहान उद्योजक कामगार मजूर यांना बरोबर घेऊन लाॅकडाऊन झुगारुन देतील. याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशारा अशोक हिंगे यांनी दिला आहे.
===Photopath===
250321\25bed_1_25032021_14.jpg
===Caption===
विडा येथे धुरवडीला जावयाला गाढवावरून मिरवण्याची प्रथ ८० वर्षांपासून चालत आली आहे. मात्र यंदा कोरोनामुळे ही परंपरा खंडीत झाली आहे.