गेवराई : तालुक्यातील पांचाळेश्वर येथील दिगंबर जैन समाजाचे श्री १००८ नंदीश्वर भगवान अतिशय क्षेत्र म्हणून भारतभर प्रसिद्ध आहे. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत येथे बुधवारी वार्षिक यात्रा महोत्सव व पंचामृत अभिषेक सोहळा उत्साहात पार पडला.
दिनांक २९ मार्चपर्यंत सिद्धचक्र महामंडल विधानही संपन्न होत आहे. यावेळी भाविकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दर्शनाची सुविधा केली होती. आचार्य श्री १०८ गुप्तीनंदी महाराज यांच्या वाणीतून ऑनलाईन महामस्तकाभिषेक व पंचामृत संपन्न झाले. येथे भाविकांच्या सोयीसाठी तीन मजली प्रशस्त धर्मशाळा बांधण्याची योजना असून, ती आमच्या भविष्यातील योजनेचा एक भाग आहे, असे क्षेत्राचे अध्यक्ष श्रीपाल गंगवाल यांनी सांगितले. यावेळी क्षेत्राचे उपाध्यक्ष सुगनचंद कासलीवाल, कोषाध्यक्ष गौतम काला, सचिव भाऊसाहेब बाकलीवाल, विश्वस्त कैलास खोबरे, भगवानदास काला, संजय सेठी, प्रकाशचंद सेठी, दिलीप गंगवाल, अशोकचंद कासलीवाल आदी उपस्थित होते. कोरोनामुळे सरकारी नियमांचे पालन करताना घरुनच ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेत भाविकांनी ट्रस्टला सहकार्य केले. ट्रस्टतर्फे अभिजीत काला यांनी भाविकांचे आभार मानले.
===Photopath===
240321\sakharam shinde_img-20210324-wa0012_14.jpg
===Caption===
गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर येथील दिगम्बर जैन समाजाचे श्री.१००८ नंदीश्वर भगवान अतिशय क्षेत्र येथे कोरोना नियमांचे पालन करत बुधवारी वार्षिक यात्रा महोत्सव व पंचामृत अभिषेक सोहळा पार पडला. त्यावेळी उपस्थित भाविक.