केज तालुक्यातील १ लाख ३ हजार १७२ हेक्टर क्षेत्रापैकी ६५८३२ हेक्टर क्षेत्रांत सोयाबीन, ११२७ हेक्टर मध्ये मूग, १३ हजार १४४ क्षेत्रात कापूस, ३५२८ हेक्टर मध्ये तूर, तर २५३० हेक्टर क्षेत्रात बाजरी पेरणी करण्यात आली होती. यावर्षी सर्वाधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरा आहे. मागील चार दिवसांत सलग दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती ऑनलाइनद्वारे तक्रार नोंदवून केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने कृषी सहायक व तलाठी नुकसानीचे पंचनामे करतील व त्यानंतर तालुक्यातील पिकांचे किती नुकसान झाले आहे याची सविस्तर माहिती समजू शकेल, अशी माहिती तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी लोकमतला दिली.
080921\53231815-img-20210908-wa0032.jpg~080921\53231817-img-20210908-wa0029.jpg
तालुक्यात झालेल्या पावसाने शेतातील पिकाची अशी अवस्था झाली आहे.~शेतातील पिके पावसाने अशी आडवी पडून पिकाचे नुकसान झाले