बारा तास वीज पुरवठा होता बंद
शिरूर कासार : रविवारी रात्री साधारणपणे आठच्यासुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शिरूरकरांना रात्र अंधारात काढावी लागली. डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. जोराचा पाऊस नाही आणि वारेसुध्दा नव्हते, तरी लाईट कशी गेली, याचे कोडे कायम होते.
जनावरांच्या बाजाराचा पडला विसर
शिरूर कासार : तालुक्यात सर्वात मोठा व पहिला जनावरांचा बाजार शिरूरला भरत होता. पशुधनाच्या खरेदी-विक्रीपोटी लाखो रुपयांची उलाढाल होत होती. मात्र कोरोनामुळे जनावरांचा बाजार भरत नसल्याने त्याचा विसरच पडत आहे.
नद्या-नाल्यांसह जलाशय तहानलेली
शिरूर कासार : तालुक्यात पाऊस पडल्याने पेरण्या होऊन शेतशिवार हिरवागार दिसत आहे. शेतकरी कामात व्यस्त असला, तरी मोठा पाऊस झाला नसल्याने ओढे, नाले, नद्या व जलाशय पाण्याविना अद्याप तहानलेलीच आहेत.