बीड : नगर पालिकेच्या पथकाने शहरातील एमआयडीसी भागात प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यासह विक्री करणाºया चार दुकानांवर धाड टाकून १८९० किलो प्लास्टिक तसेच कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. शुक्रवारी केलेल्या या कारवाईत एकूण ३५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.शहरातील एमआयडीसी भागात ओम आॅईल मिल परिसरात एका कारखान्यात प्लास्टिकचे उत्पादन केले जात असून उत्पादीत माल ५० मायक्रॉन जाडीपेक्षा कमीचे असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन नगर पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे निरीक्षक आर. एस. जोगदंड व इतर स्वच्छता निरीक्षक तसेच कर्मचाऱ्यांच्या पथकाने अमीत जगदीश सिकची यांच्या कारखान्यावर छापा मारुन तपासणी केली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साठा आढळून आला. सदर साठा विनापरवाना प्लास्टिक थर्माकोल हाताळणी, उत्पादन, वाहतूक, विक्री, वापर अधिनियम २०१८ नुसार अवैध असल्याने १५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.या ठिकाणी उत्पादन, साठवणूक आणि विक्री करण्यासाठी असलेल्या प्लास्टिकच्या प्रत्येकी ३० किलोच्या ६३ बॅग (१८९० किलो) जप्त केल्या. ज्याची किंमत दोन ते अडीच लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर शहरातील हिरालाल चौक भागात पथकाने दुकानांची तपासणी केली तर हातगाड्यांवरील कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. तर राजेश प्लास्टिक, कन्हैय्यालाल ओस्तवाल, सय्यद कादरी टोबॅको, गौतम किराणा आदी चार दुकानांवर आढळून आलेल्या कॅरीबॅग, प्लास्टिक जप्त करुन प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारला.आरोग्य विभाग प्रमुख व्ही. टी. तिडके, आर. एस. जोगदंड, भागवत जाधव, भारत चांदणे, महादेव गायकवाड, मुनेश गायकवाड, बाबासाहेब जोगदंड, लखन प्रधान, राजु जोगदंड, राम राकडे, रोहीत जोगदंड, प्रशांत ओव्हाळ, पवन लाहोट आदींच्या पथकाने सदरील कारवाई केली.
प्लास्टिक कारखान्यासह दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:14 AM
नगर पालिकेच्या पथकाने शहरातील एमआयडीसी भागात प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यासह विक्री करणाºया चार दुकानांवर धाड टाकून १८९० किलो प्लास्टिक तसेच कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या.
ठळक मुद्देबीड पालिकेचा बडगा : १८९० किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजार रुपये आकारला दंड