बीड : जिल्हा परिषदेमधील ७९३ शिक्षकांचे दीड ते दोन वर्षांचे थकलेले वेतन अदा करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. या निर्णयामुळे प्रतीक्षेत असलेल्या ७९३ शिक्षकांना न्याय मिळाला असून त्यांचे थकित वेतन विनाविलंब फेब्रुवारी २०१९ च्या वेतनामध्ये समाविष्ट करून अदा करण्यात यावेत, अशी मागणी बहुजन शिक्षक संघटनेने केली आहे.बृहत आराखड्यानुसार तसेच सुरु झालेल्या २२१ नवीन शाळा, ५ वी ते ८ वीचे वाढीव वर्ग यावर शिक्षक कार्यरत होते. आॅक्टोबर मध्ये या शाळांना मान्यता मिळाली. मात्र पायाभूत पदांपेक्षा मान्य पदांची संख्या जास्त असल्याने व संचमान्यता न झाल्याने ७९३ कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रश्नी पाठपुरावा करुन २७ नोव्हेंबर २०१५ मध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडून ७९३ वाढीव पदे मंजूर करुन घेतली. त्यामुळे या शिक्षकांना ११ नोवहेंबरपासूनचे वेतन मिळू लागले. मात्र सप्टेंबर २०१३ ते नोव्हेंबर २०१५ पर्यंतचे साधारण दीड ते दोन वर्षांचे वेतन रखडले होते. त्यामुळे आपल्या हक्काच्या थकित वेतनासाठी आंदोलने करत शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. वेतन थकल्यामुळे शिक्षकांसमोर विधि आर्थिक अडचणी होत्या. याबाबत बहुजन शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद, पुणे तसेच मंत्रालयापर्यंत वारंवार पाठपुरावा केला. अनेक वेळा त्रुटी काढल्या जायच्या मात्र परिपूर्ण माहिती गेल्यानंतर मुळ अतिरिक्त शिक्षकांचेवेतन अदा करण्याबाबत १२ फेब्रुवारी रोजी शिक्षण संचालकांनी आदेश दिले. या आदेशाचे स्वागत करुन थकित वेतन फेब्रुवारी २०१९अशी मागणी बहुजन शिक्षक संघटनेच्या वतीने विजयकुमार समुद्रे ,विनोद कांबळे ,श्रीराम गवते ,नामदेव वाघ, इम्रान मिर्झा वाघमारे डी एस ,किशोर भालेराव प्रवीण नलावडे दिलीप भालेराव बाबासाहेब मुसळे तात्यासाहेब गवते वसंत जाधव मुकुंद खांडे श्याम नवले मधुकर नाईक राऊत सर संगीता चाटे बबन पंडित महादेव झनकर, हजारे , मोरे, साखरे, मस्के, तेलंग मॅडम, घायाळ, गावंडे , कदम, जितेंद्र अशोक सातपुते, अवताने यांच्यासह सर्व व्यक्तीत वेतनधारक शिक्षक बहुजन शिक्षक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे
७९३ शिक्षकांचे थकित वेतन अदा करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:21 AM
जिल्हा परिषदेमधील ७९३ शिक्षकांचे दीड ते दोन वर्षांचे थकलेले वेतन अदा करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.
ठळक मुद्देबहुजन शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश : थकित रक्कम फेब्रुवारीच्या वेतनात समाविष्ट करण्याची मागणी