माजलगाव : शहरातील बँक कॉलनी या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमुन लग्न सोहळा साजरा केल्याप्रकरणी आयोजक बाळू ताकट यांच्यासह 25 जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या विवाह सोहळ्यास छत्रपती संभाजीराजे भोसले हे उपस्थित होते.
मागील अकरा वर्षापासून शिवजयंतीनिमित्त बाळू ताकट हे सामूहिक विवाह चे आयोजन करत असतात. याही वर्षी त्यांनी एकतीस जोडप्यांचे सामूहिक विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यांनी केवळ अकरा लग्नच मंडपात लावले व 20 लग्न हे संबंधिताच्या घरी लावण्यात आले. या विवाह सोहळ्यास छत्रपती संभाजीराजे भोसले हे उपस्थित होते.
या लग्न समारंभास मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. लग्न आयोजकांनी व त्यांच्या साथीदारांनी 144 कलमचा नियम तोडत , कोरोना विशाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काढण्यात आलेल्या नियमाचा भंग करणे व कोरोना संसर्ग पसरवे आदि.नियम तोडल्या प्रकरणी शहर पोलीसांनी रात्री उशिरा पोलीस शिपाई अमृत मोहन पाटोळे यांच्या फिर्यादीवरून आयोजक बाळू ताकट , राहुल मुगदिया , ऋषिकेश शेंडगे , प्रशांत होके , सुरज पवार , संजय दिग्रस्कर ,अमर राजमाने , अतुल होके , प्रदीप जाधव ,सचिन सुरवसे यांच्यासह अज्ञात 10-15 जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.