बीड : गुन्हेगारी करून तालुक्यात दहशत माजविणाऱ्या गेवराई तालुक्यातील पाच गुंडांना बीड जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी केली आहे.बळीराम नामदेव बेडके, विजय नामदेव बेडके (रा.राजापूर ता.गेवराई), राहुल लक्ष्मण गायकवाड, संजय विठ्ठल खाजेकर (रा.गेवराई), संदीपान अरून कोकाट (रा.ठाकरआडगाव ता.गेवराई) अशी हद्दपार केलेल्या पाच गुंडांची नावे आहेत. बळीराम व विजय या बंधून तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत धुमाकूळ घातला होता. त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. हाच धागा पकडून पोउपनि शरद पवार यांनी त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला.तसेच जुगाराचे गुन्हे करणाऱ्या संजय, संदीपान व राहुलचा प्रस्ताव गेवराई पोलिसांनी तयार केला. याची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जून भोसले यांनी केली. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी पाठपुरावा केला होता. भोसले यांनी या सर्वांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत शिफारस केली. यावर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी या पाचही गुंडांना वर्षासाठी बीड जिल्ह्यातून हद्दपार केले. या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत केले जातआहे.
गेवराई तालुक्यातील पाच गुंड जिल्ह्यातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 12:23 AM