बीड : रबी हंगामातील पेरणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर झाली आहे. ज्वारी, गहू, रभरा पिके बहरात आली आहेत. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर विविध रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यक ता वर्तवण्यात येत आहे. यामुळे गरजेनुसार फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.खरीप हंगामाच्या शेवटी आणि रबी हंगामाच्या सुरुवातील जिल्ह्यात अतिवृष्टीचे संकट आले होते. त्यामुळे देखील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट आले होते. याच दरम्यान मका पिकावर लष्करी अळीचे संकट आले आहे. त्याचा प्रादुर्भाव ज्वारी या पिकावर होत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारी हे प्रमुख पीक आहे. पशुधनला चारा आणि धान्य या दोन्ही गलजा या पिकामधून भागवल्या जातात. मात्र, या पिकावर लष्करी अळीचे संकट घोंगावत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी फवारणी करावी लागणार आहे.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांनी पिकांचे सुक्ष्म निरिक्षण करुन योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे पिकांवरील रोगांचा-किडीचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो व पिकांचे होणार नुकसान टाळता येऊ शकते.शुक्रवारपर्यंत ढगाळ वातावरणहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांनी पिकाचे निरिक्षण व गरजेप्रमाणे फवारणी करणे आवश्यक आहे.कृषी विभागाचा सल्ला : हरभरा पिकावरील कीड नियंत्रण असे कराहरभरा हे जिल्ह्यातील डाळवर्गीय प्रथम क्रमांकाचे पीक आहे. यावर घाटी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर,५ टक्के लिंबुळी अर्क, १ टक्के साबण चुरा किंवा बी.टी. जीवाणू पावडर, १ ते १.५ किलो प्रति हेक्टर किंवा लिंबोळी अर्क ५ टक्के, अन्डोसल्फान ३५ ई.सी.१० मिली किंवा क्रिनॉलफॉस २५ ईस.सी २० मिली. किंवा फार्मेथिअॅन २५ ईसी २० मिली किंवा ट्रायझोपआॅ ३५ टक्के, जाल्टामेथ्रीन १ टक्के २५ मिली किंवा ट्रायझोफॉस ३५ टक्के डेल्टामध्रीन १ टक्के २५ मिली किंवा अन्डोसल्फान ३५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर पिकाचे निरक्षण करावे गरजेनुसार फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भावमक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव ज्वारी या पिकावर देखील झाला आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शेतकºयांनी पहिल्या टप्प्यात लिंबोळी अर्क ५ टक्के ५० मिली १० लिटर पाण्यात मिसळून प्रति. हे. फवारावे.लष्करी अळीची वाढ दुसºया व तीसºया टप्प्यात असेल तर इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के डब्ल्युअजी ४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ टक्क े एससी ३ मिली अथवा धायमिथॉक्सझाम १२.६ टक्के लॅमडा साहॅलोथ्रिन ९.५ टक्के, क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.योग्य पद्धतीने फवारण्या झाल्यास लष्करीअळीचा प्रादुर्भाव कमी होते. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.
ढगाळ वातावरणामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 12:01 AM
रबी हंगामातील पेरणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर झाली आहे. ज्वारी, गहू, रभरा पिके बहरात आली आहेत. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर विविध रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यक ता वर्तवण्यात येत आहे.
ठळक मुद्देपिकांवर फवारणी करण्याचा कृषी विभागाचा सल्ला : ज्वारी, हरभरा पिकांवर घाटी व लष्करी अळी वाढण्याची शक्यता