बीड : जिल्हाभरात यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने रबीची पिके चांगली बहरली आहेत; परंतु अनेक ठिकाणी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. कृषी विभागाने सल्ला देण्याची मागणी होत आहे.
इंटरनेट सेवा मिळेना
बीड : काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नाही.
दलालांचा सुळसुळाट
अंबाजोगाई : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते; पण अंबाजोगाई तहसील कार्यालयात मात्र, दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात.
काटेरी झुडपांचा त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० किमी रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.
पर्यावरण धोक्यात
अंबाजोगाई : शहर परिसरात वीटभट्ट्या आहेत. परवानगी नसतानाही भट्ट्या सुरू आहेत. प्रदूषण निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्यांवर कारवाईची मागणी होत आहे.