शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
2
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
3
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
4
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
5
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
6
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
7
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
8
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
9
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
10
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
11
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
12
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
13
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
14
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
15
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
16
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
17
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
18
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
19
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
20
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."

संतापजनक! 'ती' अल्पवयीन पीडिता अनेकांची 'शिकार'; जबाबातून धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:13 IST

आठ दिवसापूर्वी पीडितेने सकाळच्या दरम्यान राहत असलेल्या मावशीच्या घरी विषारी द्रव्य प्राशन करत टोकाचे पाऊल उचलले होते.

कडा (बीड): मावशीच्या घरी शिक्षणासाठी आलेली १५ वर्षीय मुलगी एकाच गावातील अनेकांकडून वासनेची शिकार बनल्याची धक्कादायक बाब तिने दिलेल्या जबाबातून समोर आली आहे. विशेष म्हणजे, 'ती' अल्पवयीन पीडिता सहा महिन्यांची गर्भवती आहे. तर यातील दोघा जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.

आष्टी तालुक्यातील एका गावात मावशी राहत असलेल्या ठिकाणी वनिता (नाव बदलले) ही शिक्षणासाठी आली होती. तिथे राहून मावशीला घरकामाला मदत करून शिक्षण घेत होती. पण याच काळात गावातील एकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून अत्याचार केला. यातून वनिता सहा महिन्याची गर्भवती राहिली. आष्टी पोलिस ठाण्यात ३ एप्रिल रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी पीडितेला न्यायालयात जबाब देण्यासाठी हजर केले असता तिने आणखी इतरांनी अत्याचार केल्याचे म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोवळ्या वयात तिच्यावर अनेकांनी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. आष्टी पोलिसांनी दत्तात्रय ऊर्फ पप्पू नवनाथ जाधव, सोहम सुधीर खलाटे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. इतर आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

तिने उचलले होते टोकाचे पाऊल !आठ दिवसापूर्वी पीडितेने सकाळच्या दरम्यान राहत असलेल्या मावशीच्या घरी विषारी द्रव्य प्राशन करत टोकाचे पाऊल उचलले होते. तिच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना ती गर्भवती असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यानी एमएलसीत अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे नमूद केले होते. उपचार घेऊन घरी येताच पीडितेने ३ एप्रिलच्या रात्री आष्टी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने एकावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या