समाधानचे वडील अहमदनगर येथे माथाडी हमाल म्हणून काम करतात. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आई मजुरी करुन संसाराला हातभार लावत. मुलांनी आपल्यासारखे काबाडकष्ट न करता शिकून मोठे व्हावे असे समाधानच्या आई, वडिलांचे स्वप्न होते. ते समाधानने पुर्ण केले. समाधानचे प्राथमिक शिक्षण मामाकडे हाजीपुर येथे झाले तर पुढील शिक्षण अहमदनगर व पुणे येथे झाले. बारावीनंतर सी.ए. होण्याचा दृढनिश्चय केला. रात्रंदिवस अभ्यास करून ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मनाशी जिद्द बाळगली. वेळप्रसंगी त्याने केटरिंगची कामे तसेच मेडिकल व इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात कामे करून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. २०१७ ला.सी ए.च्या पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले. परंतु २०१८ च्या परिक्षेच्या निकालात तो उत्तीर्ण झाला. त्याच्या यशाने आई-वडिलांच्या आनंदासमोर गगन ठेंगणे झाले.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
प्रतिकूलतेवर मात करीत हमालाचा मुलगा झाला सी.ए.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:31 AM