ढगाळ वातावरण
शिरूर कासार : शनिवारी सकाळपासून आभाळ झाकाेळून आल्याचे चित्र एकीकडे, शेतात उन्हाळी पिकांची काढणीची गडबड असतानाच आभाळ दाटून येत आहे. यामुळे चित्र शेतक-यांना चिंतेत टाकत आहे. हवामान विभागानेही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
लिंबाची गोड गुणकारी काडी
शिरूर कासार : कोरोनाच्या संकटकाळात आयुर्वेदिक औषधी, झाडपाला, काढा या गोष्टीला अधिक पसंती दाखवली जात आहे. अगदी सकाळी मंजन व टूथ ब्रश वापरणारे आता हातात कडूलिंबाच्या काडीने दात घासण्यास पसंती दाखवत आहेत. चवीने कडू असली तरी आरोग्याच्या दृष्टीने गोड गुणाची मानली जात आहे. माॅर्निंग वाॅकला जाणारे येतानाच लिंबाच्या काडीने दात घासत परतत असल्याचे दिसून येतात. पित्तनाशक, मुख शुध्दीसाठी गुणकारी असल्याचे सांगण्यात येते.
नाल्याचे पाणी सिध्देश्वर बंधाऱ्यात सोडण्याचा घाट
शिरूर कासार : शहरातून पाथर्डी-बीडवर (पालखी रस्त्याचे) काम सुरू आहे. दोन्ही बाजूने नाली बांधकाम सुरू आहे. हे पाणी सिध्देश्वर बंधा-यात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. सिध्देश्वर बंधारा हा दहिवंडी, वार्णी, शिरूर यांची तहान भागवण्याचे काम करतो. जर हे नाल्याचे पाणी बंधा-यात सोडले, तर ते आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. तेव्हा वेळीच हे पाणी बंधा-यात न सोडता त्याला पर्याय शोधावा, अशी मागणी होत आहे.
...
ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक
शिरूर कासार :
महिनाभरापासून तालुक्यात कोरोना महामारीचा आकडा वाढतच आहे. शहरात देखील कोरोनाबाधित रुग्ण निघतात. मात्र त्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक प्रमाणात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. कोरोनाबाबतची नियमावली पाळली जात नसल्याने खेड्यापाड्यात बाधित जास्त निघत असल्याचे दिसून येत आहे.
शेत मशागतीला वेग
शिरूर कासार : मे महिना अर्ध्यावर आला आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यात हवामान विभागानेही पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पावसाचे आगमन होईल, असा अंदाज बांधत शेतकरी आता शेतमशागतीत गुंतला आहे. उन्हाळी पिके काढून त्या शेताची मशागत करण्यात तो व्यस्त आहे.
कोविड सेंटरकडे जाणा-या रस्त्यावर खड्डे
शिरूर कासार : शासनाचे कोविड केअर सेंटर शासकीय निवासी शाळेत सुरू आहे. मात्र तिकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रुग्ण, त्यांचे नातेवाईक, आरोग्य यंत्रणेला हा रस्ता त्रासदायक ठरत आहे. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने रस्त्याची दुरवस्था कायम आहे. तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.