स्थलांतराने रोहयो कामे घटली
अंबाजोगाई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असलेल्या कामांना मागणी घटली असल्याचे चित्र आहे. सध्या शेतात मोठ्या प्रमाणात मशागतीची कामे, काढणी, मोडणी, ऊस लागवड सुरू असल्याने शेतमजुरांना शेतावरच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. तर ग्रामीण भागातील बहुतांश मजुरांनी ऊसतोडणीसाठी कारखान्याकडे स्थलांतर केले आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. ऊसतोड मजुरांच्या स्थलांतरामुळे हे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
गेवराई परिसरात
चोऱ्यांचे प्रमाण वाढले
गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचा बंदोबस्त करून शहरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पोलीस ठाण्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन चोऱ्यांचे शोध लावावेत, अशी मागणी केली जात आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.