बीड : जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांकरीता पंचायत समितीमधील सभापतीपदाच्या विद्यमान आरक्षणची मुदत संपल्याच्या दिवसानंतर येणाऱ्या लगतच्या दिवसापासून सुरु होणा-या अडीच वर्षाच्या कालावधीकरीता पुरुष आणि महिला अशा जाती- जमाती आणि नागरीकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग निहाय त्यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या सभापती पदाचे बीड जिल्ह्यातील पंचायत समितीनिहायआरक्षण निश्चित करण्यासाठी १६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोडत होणार आहे.अनुसुचित जाती (महिला) यांच्यासाठी सभापतींच्या पदांची संख्या - १, नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गसाठी (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) सभापतींच पदांची संख्या -१, नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्ग (महिला) (विमुक्त जाती व भटक्या जमाती सह) राखुन ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीच्या पदांची संख्या - २, सर्वसाधारण प्रवगार्साठी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीच्या पदांची संख्या - ३, सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) साठी राखुन ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीच्या पदांची संख्या - ४ अशी आहे. तरी सर्व राष्ट्रीय व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे पदाधिकारी यांना व सर्व जनतेस या बैठकीस उपस्थित राहण्याचे, आवाहन सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत १६ डिसेंबर रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:26 AM