बीड - परदेशातील काळापैसा भारतात आणता आल्यास प्रत्येक नागरिकाच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करता येतील, या नरेंद्र मोदींनी 2014 साली निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनामुळे केंद्र सरकार आणि भाजपाची चांगलीच गोची होत आहे. पंधरा लाख खात्यात कधी जमा होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पंधरा लाख रुपयांबाबत प्रश्न विचारला असता, ''पंधरा लाख रुपये जनतेच्या खात्यात कसे जमा होत आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच स्पष्टपणे सांगू शकतील.'' असे म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील एका गावातील लोकांच्या बँक खात्यात काही पैसे जमा झाले होते. हे पैसे कुणी जमा केले हे बँक अधिकाऱ्यांनाही सांगता येत नव्हते. दरम्यान, बीडच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्या म्हणल्या की, पिकविमा, नुकसान भरपाई अशा विविध माध्यमातून सरकार लोकांच्या खात्यात पैसे जमा करत आहेत. आता पंधरा लाख रुपये लोकांच्या खात्यात कसे जमा होतील याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीच अधिक स्पष्टपणे सांगू शकतील, असा मला विश्वास आहे. आता बेघराला घर द्यायचं असेल, पिकविमा असेल, हमीभाव असेल या माध्यमातून मोदींनी आपला आकडा पूर्ण केला आहे, असे मला वाटते.
15 लाख रुपयांपैकी पहिला हप्ता खात्यात जमा, पंकजा मुंडेंनी दिले असे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 9:20 PM
परदेशातील काळापैसा भारतात आणता आल्यास प्रत्येक नागरिकाच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करता येतील, या नरेंद्र मोदींनी 2014 साली निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनामुळे केंद्र सरकार आणि भाजपाची चांगलीच गोची होत आहे.
ठळक मुद्देप्रत्येक नागरिकाच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करता येतील, या नरेंद्र मोदींनी 2014 साली निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनामुळे केंद्र सरकारची गोची होत आहेपंधरा लाख रुपये जनतेच्या खात्यात कसे जमा होत आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच स्पष्टपणे सांगू शकतील, असे पंकजा मुंडेंनी सांगितले