पावसाअभावी पिकांचे नुकसान ; विमा मिळत नसल्याचेही मांडले गाऱ्हाणे
अंबाजोगाई : ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी लातूरकडे जाताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी रस्त्यात जागोजागी थांबून मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या, व्यथा जाणून घेतल्या. पावसाअभावी सध्या पिकांचे होत असलेले नुकसान आणि पीकविमा मिळत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.
पंकजा मुंडे या शनिवारी सकाळी परळीहून लातूरकडे जाण्यासाठी निघाल्या असता रस्त्यात अंबाजोगाई व परिसरात ठिकठिकाणी त्यांनी शेतकरी व नागरिकांच्या भेटी घेतल्या. अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाअभावी हाताशी आलेले पीक जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच पीकविम्याबाबतही शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले. यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. वरवटीनंतर पिंपळा धायगुडा, शेपवाडी, अंबाजोगाई, वाघाळा, राडी, सायगाव, सुगाव, भारज, बर्दापूर आदी मतदारसंघातील गावच्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. सर्व ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
140821\1626-img-20210814-wa0085.jpg
पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनच्या व्यथा जाणुन घेतल्या