शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला, बीड जिल्ह्यात आणखी एका तरूणाने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 7:05 PM

आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील घटना

- नितीन कांबळेकडा (बीड) - लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा झालेला निसटता पराभव जिव्हारी लागल्याने मुंडे समर्थक एका तरूणाने गळफास घेऊन जिवन संपवल्याची घटना मंगळवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली. पोपट वायभासे असे मृत तरूणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील अशी दुसरी घटना असून यापूर्वी ९ जून रोजी अंबाजोगाई येथील युवकानेही मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने जीवन संपवले होते. 

आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट मधुकर वायभासे (३७) हा तरूण मुंडे समर्थक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागला. पराभव झाल्यापासून तो सारखा विचारात गेला होता. मंगळवारी रात्री  दरम्यान त्याने कोणाला काही एक न बोलता चिंचेवाडी शिवारात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन जिवन संपवल्याची घटना घडली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शोकाकुल वातावरणात बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. गावांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

फेसबुक पोस्टनंतर गळफास...गळफास घेण्यापुर्वी अगदी काही मिनिट अगोदर पोपट याने स्वताच्या मोबाईल वरून अलविदा... ही फेसबुक पोस्ट केल्यानंतर गळफास घेतला.

अंबाजोगाई येथील युवकानेही संपवले होते जीवन पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे (वय -३३) याने ९ जून रोजी सकाळी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पांडुरंग आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. मात्र गावचे सरपंच व इतरांनी त्याची समजूत काढली होती.

टॅग्स :beed-pcबीडPankaja Mundeपंकजा मुंडेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल