परळी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे ह्या चुलत बहीण-भावात होत असलेली अटीतटीची लढत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. दोघांसाठीही राजकीयदृष्ट्या अस्तित्वाची लढाई आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून परळी मतदारसंघात पहिल्या पोस्टल फेरीनंतर धनंजय मुंडे यांनी ४९९ मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना ४७९५ मतं मिळाली असून पंकजा मुंडे यांच्या पारड्यात ४२९६ मतं पडली आहेत.
पंकजा आणि धनंजय मुंडे हे २०१४ मध्येही एकमेकाच्या विरोधात लढले होते. परंतु, २५ हजारांच्या मताधिक्याने पंकजा विजयी झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमुळे निर्माण झालेल्या भावनिक लाटेचा पंकजांच्या विजयात मोठा वाटा होता. आता तुल्यबळ लढत होत आहे. पारडे कुणाचेच जड म्हणता येत नाही.