झाडे बहरू लागली
बीड : शहरातील दुभाजकांवर सुशोभिकरणाची झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे चांगल्या प्रकारे बहरू लागल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे.
पर्यावरण धोक्यात
अंबाजोगाई : शहर परिसरात वीटभट्ट्या आहेत. परवानगी नसतानाही भट्ट्या सुरू आहेत. प्रदूषण निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
सिग्नल सुरू करा
बीड : शहरातील मुख्य चौकात असलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे अनेकवेळा वाहनधारक, नागरिकांतून सुरू करण्याची मागणी होती, परंतु याची दुरूस्ती झालेली नाही.
श्वानांचा त्रास वाढला
बीड : शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे भटके कुत्रे टोळक्याने बसत असल्याने रात्रीच्या वेळेस हे कुत्रे दिसून येत नसल्याने हल्ला चढवत आहेत. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.