शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शिरूर कासारमध्ये पार्किंगचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:40 AM

शिरूर कासार : शहरातील विविध शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक वाहने रस्त्यावरच बेशिस्तपणे उभी करीत आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना ...

शिरूर कासार : शहरातील विविध शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक वाहने रस्त्यावरच बेशिस्तपणे उभी करीत आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना अडचण होत असून, वाहनांची कोंडी होत आहे.

लोंबकळणाऱ्या तारांचे अपघातास निमंत्रण

बीड : शहरातील पांगरी रोड, सहयोगनगर, स्वराज्यनगर, बार्शीनाका, नगरनाका, एमआयडीसी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळल्या आहेत. अनेकांच्या घरावरून, तर काहींच्या घरासमोरून या तारा गेल्या असून, अनेक भागांतील तारा जीर्ण आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

वाढीव वीजबिलांबाबत संभ्रम

वडवणी : लॉकडाऊनच्या काळातील वीजबिले भरमसाट आल्याने तालुक्यातील हजारो वीजग्राहकांनी महावितरणकडे वाढीव बिले आल्याच्या लेखी तक्रारी केल्या आहेत. वीजबिले भरण्याबाबत अजूनही ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.­

ग्रामीण भागात पथदिव्यांचा अभाव

पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागात असणारे बहुतांश पथदिवे बंद स्थितीत राहतात. परिणामी चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पथदिवे व वीजपुरवठा सुरू करून ग्रामीण भागातील ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

शेख सिराज यांचा सत्कार

बीड : आम आदमी विमा योजना शिष्यवृत्तीचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अंबाजोगाई येथील गट शिक्षण कार्यालय यांच्या वतीने शेख सिराज यांचा गटशिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी यांनी सत्कार केला. यावेळी रोडे, मुख्याध्यापक मनियार फारूक, विलास सोमवंशी, सुंदर नेरहरकर यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी आदी उपस्थित होते.

चौकामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन

बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात वाहतूक नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. ट्रिपल सीट वाहन चालवणे, परवाना नसणे, दुचाकीला नंबर नसणे आदी विविध वाहतूक नियमांचे पालन होताना दिसून येत आहे. येथे वाहतूक कोंडी देखील होताना दिसून येत आहे.

वीजपुरवठा तत्काळ सुरू करावा

बीड : महावितरणने थकित वीजबिले वसूल करण्याच्या नावाखाली बीड तालुक्यातील बालाघाटावरील अनेक गावांतील शेतीचा वीजपुरवठा बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. वीजपुरवठा तत्काळ सुरळीत सुरू करावा नसता महावितरणच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी रस्तयावर उतरेल, असा इशारा बीड तालुका संघटक विवेक कुचेकर यांनी दिला आहे.

रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्त

जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव ते गेवराई या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, दुचाकीस्वारांना मणक्याचे आजार जडण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे.

निरीक्षकांचे दुर्लक्ष, ग्राहकांना फटका

बीड : शहरातील विक्रेते आणि व्यावसायिकांकडील वजन काटे सदोष असून, याची वर्षभरात कोणतीही तपासणी करण्यात आलेली नाही. परिणामी ग्राहकांना याचा फटका बसत आहे. निरीक्षकांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती आहे.