परळी उपजिल्हा रुग्णालयात ८ एप्रिल रोजी ४८५ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. जिल्ह्यातील इतर उपजिल्हा रुग्णालयांपेक्षा सर्वांत जास्त लस घेतल्याचा उल्लेख यावेळी झाला. परळी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण व शहरी भागांत कोरोना लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. गाढे पिंपळगाव येथे बुधवारी लस देण्यात येणार आहे; तर शहरातील खंडोबा मंदिर येथील आरोग्य केंद्रातही लस देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
परळी शहरातील १० हजार ३४ जणांना लस देण्यात आली आहे; तर ग्रामीण भागातील धर्मापुरी, मोहा, नागापूर पोहनेर, सिरसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७२८२ जणांना ही लस देण्यात आल्याची माहिती परळीचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.
परळी तालुक्यातील कोविड लसीकरण
प्राथमिक आरोग्य केंद्र
सिरसाळा -२०२१
धर्मापुरी - १४२६
नागापूर - १६८३
मोहा - ११६८
पोहनेर - ९८४
परळी उपजिल्हा रुग्णालय - १०,०३४
एकूण लसीकरण - १७,३१६
सिरसाळ्यात - १०६ टक्के
सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात १९०० लोकांचे उद्दिष्ट होते. येथे १०६ टक्के लसीकरण झाले. त्यापाठोपाठ नागापूर येथे ८८ टक्के, धर्मापुरी येथे ७५ टक्के, पोहनेर ५७, तर मोहा येथे ६१ टक्के लसीकरण झाले.