महाराष्ट्र रस्ते सुधार योजनेतून ८५ कोटी रुपयांच्या परळी-फावडेवाडी रस्त्याच्या कामाचे व घाटनांदूर गावअंर्तगत विविध विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुंडे बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार संजय दौंड तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष शिवकन्या सिरसाट, उपजिल्हा अधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपीन पाटील, मुंबई कृऊबा सभापती अशोक डक, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, मजूर फेडरेशन अध्यक्ष बन्सीधर सिरसाट, जि. काँ. अध्यक्ष राजकिशोर मोदी, सचिन मुळूक, सभापती गोविंद फड, सभापती गोविंद देशमुख, पं. स. प्र सभापती आलिशान पटेल, बालासाहेब गंगणे, मीना भताने, रा.काँ. नेते शिवाजी सिरसाट, कृऊबा संचालक सत्यजित सिरसाट, सुधाकर माले, बंडू गित्ते, गोसावी संघटना अध्यक्ष संजय पुरी, बाबूराव जाधव, ॲड. इंद्रजित निळे, हरिअण्णा वाकडे, पणन संघाचे उपाध्यक्ष विष्णूपंत सोळंके, राजेश्वर चव्हाण, सुरेश टाक, गजानन मुडेगावकर, पं. स. सदस्य मच्छिंद्र वालेकर, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, सरपंच पती ज्ञानोबा जाधव, विश्वभर फड आदी प्रमुख उपस्थित होते .
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की मी विधानसभेत जावे ही जनतेची मोठी इच्छा असल्याने मी विधानसभेत जाऊन मंत्री होऊ शकलो. रस्ते, नाल्याचे कामे करणे म्हणजे विकास नव्हे हे कामे करणे आमचे कर्तव्य आहे. जलजीवन योजनेतून गावोगावी पाणीपुरवठा योजना राबविणार असल्याचे प्रतिपादन मुंडे यांनी केले. याप्रसंगी जि. प.अध्यक्ष शिवकन्या शिवाजी सिरसाट यांनी घाटनांदूरला पाणीपुरवठ्यासाठी निधी, ग्रामीण रुग्णालय, ट्रामा केअर सेंटर देण्याची मागणी केली. आमदार संजय दौंड यांनी सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी साठवण तलाव व बंधारे उभा करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. याप्रसंगी राजेश्वर चव्हाण, अशोक डक, बजरंग सोनवणे यांनी मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता डी. एन. पाटील यांनी केले, तर आभार राकाँचे परळी विधान सभाध्यक्ष गोविंद देशमुख यांनी मानले.