लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : परळी जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी ७० जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना भेटले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती होेती. परळी जिल्हा निर्मितीबाबत त्यांनी अनुकुलता दर्शविल्याची माहिती परळी जिल्हा निर्मिती नागरी कृती समितीचे अध्यक्ष राजेश देशमुख यांनी शुक्रवारी दिली.परळी जिल्हा करणे हे प्रशासकीय दृष्ट्या हे सोयीचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पटवून देण्यात आले. राज्यात नवीन जिल्हा निर्मितीच्या वेळी परळी जिल्ह्याच्या मागणीला प्राधान्य देण्याची मागणीही यावेळी परळीतील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच राज्यपालांचीही शिष्टमंडळाने भेट घेऊन जिल्हा निर्मिती करण्याची मागणी यावेळी केली.शिष्टमंडळात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, काँग्रेसचे व इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या सख्येने सहभागी झाले होते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाही मुंबईत परळी जिल्हा निर्मिती मागणीचे निवेदन कृती समितीच्या वतीने देण्यात आले.
जिल्हा निर्मितीसाठी परळीकर मुख्यमंत्र्यांना भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:38 AM